लाखो स्त्रिया मन आणि शरीराच्या साधनेचा सराव कसा करत आहेत ते जाणून घ्या.
आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष:
स्त्रिया प्राकृतिकरीत्याच सौम्य आणि चैतन्यशील असतात, त्यांच्यात आपुलकी आणि करुणेची भावना नकळत असते. माता, बहिणी, मुलगी आणि बायको ... या भूमिका भिन्न आहेत पण त्यांच्या जीवनाचे सार एकच आहे: त्यांचे प्रेम आणि करुणा, जे अगदी कठोर हृदय देखील वितळवू शकते. त्या शारीरिकदृष्ट्या कमकुवत वाटू शकतात, परंतु
आध्यात्मिकदृष्ट्या इतक्या मजबूत असतात की जीवनातील सर्वात कठीण आव्हाने देखील त्यांना अपयशी ठरवू शकत नाहीत. स्त्रीचे सौंदर्य केवळ शारीरिक नाही - परंतु ते "कोमल परंतु दृढ हृदय" आहे जे तिला तिच्या आयुष्यातील पुरुषांची परिपूर्ण सहकारी बनवते: तिचे वडील, भाऊ, पती आणि मुलगा.
किती चांगले होईल जर स्त्रिया अधिक सशक्त आणि दयाळू आणि पुरुष अधिक प्रशंसनीय आणि सहिष्णू असू शकले – त्यामुळे आपले जीवन, आपली कुटुंबे, आपल्या भावी पिढ्या... सर्वच अधिक सुसंवादी नसतील? आपल्या सगळ्यांची हीच इच्छा नसते का?
या संदर्भात तुम्हाला फालुन दाफा या साधना पद्धतीशी ओळख करून देऊ इच्छितो, जिचा जगभरातील १०० कोटीपेक्षा जास्त लोकांनी स्वीकार केला आहे आणि त्यांच्या जीवनाचा भाग बनवला आहे. पुष्कळ स्त्रिया देखील या साधनेचा आनंदाने सराव करत आहेत आणि निरोगी आणि समाधानी जीवनाचे ध्येय साध्य करीत आहेत.
फालुन दाफा ही मन आणि शरीराची एक प्राचीन साधना पद्धती आहे ज्यामध्ये पाच सौम्य आणि प्रभावी व्यायामांचा समावेश आहे. श्री ली होंगझी यांनी 1992 मध्ये चीनमध्ये हि साधना सार्वजनिक केली. श्री होंगझी यांना जगभरात 3,000 हून अधिक पुरस्कार आणि प्रशस्तिपत्रके देण्यात आली आहेत आणि त्यांना शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी आणि मुक्त विचारांसाठी सखारोव्ह पारितोषिकासाठीही नामांकन मिळाले आहे.
या साधना पद्धतीमुळे लोकांना चांगले आरोग्य, मानसिक शांती आणि परिपूर्ण जीवन मिळण्यास मदत होत आहे. भारतातील काही महिला फालुन दाफा प्रॅक्टिशनर्सचे अनुभव जाणून घेऊया:
चित्रा देवनानी, गृहिणी: “माझ्या पहिल्या प्रसूतीपासून मला पाठदुखीचा त्रास सुरू झाला, ज्यामुळे मला सामान्यपणे चालणेहि कठीण झाले. पण जेव्हा मी फालुन दाफाचा पहिला व्यायाम केला तेव्हा मला स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. व्यायामाच्या संथ, लयबद्ध गतीने मला लगेच आराम वाटला; आणि त्या दिवसापासून मी त्याचा सराव कधीच सोडला नाही. आज मी औषधांशिवाय पूर्णपणे बरी झाली आहे.”
गेल्या 2 वर्षांपासून, चित्रा ऑनलाइन कार्यशाळेद्वारे लोकांना फालुन दाफा व्यायाम शिकवत आहे, ज्याचा अनेकांना फायदा झाला आहे.
सुमाया हजारिका, मॉडेल, मुंबई: “व्यायाम सुरू केल्यापासून एका महिन्याच्या आत मी दम्यापासून बरे होऊ शकले. आता मी शांत आणि संयमी राहण्यास सक्षम आहे, ज्यामुळे मला कठीण परिस्थितीतही स्थिर राहण्यास मदत होते.”
मैत्रेयी रॉय, सॉफ्टवेयर प्रोफेशनल: “फालुन दाफाच्या सत्य-करुणा-सहिष्णुता या तीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे मी माझी हरवलेली आंतरिक शांती परत मिळवली आहे. माझ्या सभोवतालच्या जगाचा आणि तणावाचा मला आता त्रास होत नाही. ही साधना माझ्यासाठी उच्च शक्तीचा स्रोत बनली आहे.”
चित्रा, सुमाया आणि मैत्रेयी यांच्याप्रमाणेच भारतातील हजारो महिलांनी फालुन दाफाच्या सरावाने शांत मन, निरोगी शरीर आणि समाधानी आयुष्य मिळविले आहे. तुम्हालाही हा व्यायाम शिकण्यात स्वारस्य असल्यास, तुम्ही www.LearnFG.in वर विनामूल्य वेबिनारसाठी नोंदणी करू शकता. Falun Dafa बद्दल अधिक माहिती तुम्ही www.falundafa.org वर मिळवू शकता.
हा अभ्यास ज्येष्ठ नागरिक, मुले, तरुण यांच्यासह सर्व वयोगटासाठी उपयुक्त आहे. फालुन दाफाचे सर्व उपक्रम स्वयंसेवकां द्वारे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता केले जातात. फालुन दाफा मध्ये वेळ, स्थान आणि दिशेचे कोणतेही बंधन नाही. कोणत्याही प्रकारचे सदस्यत्व किंवा बंधन नाही. सर्व संस्कृती आणि वयोगटासाठी सुगम असलेला फालुन दाफा सदैव नि: शुल्क शिकविल्या जातो.