TOP NEWS

हर खबर आप तक, केवल आजतक 24 न्यूज पर, |    हर खबर आप तक, केवल आजतक 24 न्यूज पर,​ |    हर खबर आप तक, केवल आजतक 24 न्यूज पर, |   

फालुन दाफा अभ्यास आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरिक शक्ती देतो

 

ही कथा आहे एका माजी खलाशीची, ज्यांनी कठीण सागरी प्रवासादरम्यान, आपली आध्यात्मिक शोध पूर्ण केली आणि आंतरिक आनंद ,आरोग्याचा मार्ग शोधला. चला तर भेटूया संजीव भल्ला, वय 61, माजी खलाशी जे सध्या व्यवसायाने सॉफ्टवेअर कोडर आहेत.

“माझे वडील हवाई दलात असल्याने माझे बालपण विमानात गेले. मला लहानपणापासूनच भारताच्या विविध भागांना भेट देण्याची संधी मिळाली. पण मी त्याऐवजी जहाजे निवडली आणि मी माझ्या आयुष्यातील १४ वर्षे सातासमुद्रापार प्रवासात घालवली.”

ते म्हणाले की, जगभरात समुद्रातून प्रवास करणे रोमांचक आणि आव्हानात्मक होते. समुद्राने त्यांना आत्म-चिंतन आणि अपरिचित अनुभवांची देणगी दिली असतानाच, त्याने त्यांना अनेक जीवन-मृत्यूच्या परिस्थितीतही टाकले: जसे की चीनच्या दक्षिण समुद्रातील एका मोठ्या वादळातून वाचणे आणि न्यूयॉर्क बंदरवर एका जहाजावरील स्फोटातून सुटका." 






अखेरीस, 14 वर्षांच्या या कठोर परिश्रमाचा भल्ला यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. ते म्हणाले "मला माझ्या मणक्यात असह्य वेदना होत होत्या, ज्याचे वर्णन मी करू शकत नाही, आणि म्हणून मी शेवटी त्या सागरी प्रवासातून ब्रेक घेतला आणि बंगलोरला स्थायिक झालो". 

उदरनिर्वाहासाठी भल्लाने सॉफ्टवेअर कोडिंग शिकण्यास सुरुवात केली, परंतु संगणकावर जास्त वेळ काम करणे सोपे नव्हते. त्यांनी आठवले की तीव्र स्पॉन्डिलायटिसमुळे त्यांना मानेच्या तीव्र वेदना कमी करण्यासाठी अनेकदा सपोर्ट कॉलर घालावी लागत असे.

ते म्हणाले, “वेदनेचाही एक फायदा आहे. वेदना तुम्हाला असे प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करते ज्यांची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. माझ्या वेदनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मी अनेक आध्यात्मिक पद्धती जाणून घेतल्या, फिजिओथेरपी, योगा इत्यादींची मदत घेतली. पण फालुन दाफा या प्राचीन अध्यात्मिक पद्धतीच्या संपर्कात येईपर्यंत कोणीही मला कायमस्वरूपी बरे करू शकले नाही.”

फालुन दाफा (फालुन गोंग म्हणूनही ओळखले जाते) ही एक प्राचीन आध्यात्मिक प्रणाली आहे ज्यात पाच सौम्य व्यायाम शिकवल्या जातात सोबतच "सत्य, करुणा आणि सहिष्णुता" या तीन मुख्य तत्त्वांचे पालन करण्यावर मुख्याने भर दिल्या जाते. भल्ला म्हणाले की त्यांनी बागेत नियमितपणे इतर अभ्यासूं सोबत फालुन दाफा व्यायामांचा सराव करण्यास सुरुवात केली.

ते म्हणाले “हे सोपे व्यायाम कुठेही करता येतात. "दिवसाच्या कोणत्याही वेळेसाठी कोणतेही नियम नाहीत, म्हणून ते माझ्यासाठी खूप सोयीचे ठरले"  

“फालुन दाफाच्या माझ्या आध्यात्मिक प्रवासाचे ते दुसरे वर्ष होते, जेव्हा एक चमत्कार घडला. तो दिवस जणू एखाद्या काल्पनिक कादंबरीतील आहे - ही एक अवास्तव भावना होती! फालुन दाफा मधील दुसऱ्या व्यायामादरम्यान, मला उर्जेचा प्रचंड प्रवाह जाणवला आणि त्यामुळे माझे संपूर्ण शरीर थरथरले. मला माझ्या मानेत क्लिकचा आवाज ऐकू आला, आणि त्यानंतर मला कधीही सपोर्ट कॉलर घालावा लागला नाही. माझ्या मानेचा तीव्र स्पॉन्डिलायटिस बरा झाला आणि माझ्या मणक्याला पुन्हा दुखापत झाली नाही”.

त्या घटनेला 10 वर्षे झाली आहेत आणि भल्ला म्हणाले की त्यांना नेहमीपेक्षा अधिक निरोगी वाटते . तथापि, त्यांनी जोर दिला की " केवळ हे व्यायाम करणे पुरेसे नाही. सत्य, करुणा आणि सहिष्णुतेने जीवन जगणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

"लहानपणापासून, मी माझ्या जीवनाबद्दल आणि विशाल विश्वाबद्दल उत्तरे शोधत होतो आणि त्यांच्या शोधात मी अनेक आध्यात्मिक मार्गांचा अभ्यास केला. जेव्हा मी फालुन दाफा सरावाचे मुख्य पुस्तक – 

“झुआन फालुन” - वाचले तेव्हा मला माझी उत्तरे अगदी स्पष्टपणे मिळाली. हे पुस्तक वाचल्यानंतर, मला असे वाटले की मला यापुढे कोणतेही प्रश्न नाहीत आणि माझ्या जीवनाचा मार्ग मला स्पष्ट झाला. 

तुम्हालाही ही साधना पध्धती शिकण्यास स्वारस्य असल्यास तुम्ही www.LearnFalunGong.in वर विनामूल्य वेबिनारसाठी नोंदणी करू शकता. फालुन दाफा बद्दल अधिक माहिती www.FalunDafa.org वर मिळवू शकता.